Sunday, 20-05-2012   
 
 
भक्ती-शक्ती उद्यान


भौगोलिक स्थान व विस्तार


पुणे शहराच्या उत्तरेला १६ किलोमीटर अंतरावर पिंपरी-चिंचवड हे शहर वसले आहे.या शहराचे क्षेत्रफळ १७१ चौरस किलोमीटर असून समुद्रसपाटीपासूनची उंची ६०० मीटर इतकी आहे. या भागातील हवामान मोसमी स्वरुपाचे असून वार्षिक पर्जन्यमान सरासरी ७१ सेंटीमीटर इतके आहे. पिंपरी-चिंचवड शहराचे जगाच्या नकाशावरील स्थान ७३.५५ रेखांश व १८.३२ अक्षांशावर आहे.

शहराच्या मध्यातून पुणे-मुंबई रस्ता व लोहमार्ग जातो. या लोहमार्गाच्या दोन्ही बाजूंना शहराचा विस्तार झाला आहे. दक्षिणेला मुळा नदीपासून उत्तरेला दुर्गादेवी टेकडीपर्यंत व पश्चिमेला हिंजवडीपासून पूर्वेला आळंदीपर्यंत शहराचे क्षेत्र विस्तारले आहे. शहरातून पवना ही पूर्ववाहिनी नदी वाहते, दक्षिण सीमेवर मुळा व ईशान्येला इंद्रायणी नदी आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात दाट लोकवस्ती व औद्योगिक क्षेत्र आहे. शहराच्या काही भागात शेतजमीन असून बराचसा भाग संरक्षण खात्याने व्यापला आहे.
 
Search
Area
Category
 

This site is owned by Pimpri Chinchwad Infomedia Pvt.Ltd;
Bhakti Complex, Behind Dr. Ambedkar statue, Off Mumbai-Pune Highway, Kharalwadi, Pimpri, Pune-411018.
Phone no. @ 2742 42 02. Email:pciplindia@gmail.com
© All rights reserved