Sunday, 20-05-2012   
 
 
ज्ञानप्रबोधिनी विद्यालय


शैक्षणिक


पिंपरी - चिंचवड शहरात अनेक नामंकित शिक्षण संस्था आहेत. डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे शिक्षण संकुल असून त्यांच्या सुमारे ५५ शाखा कार्यरत आहेत. याचबरोबर व्यवस्थापन, वैद्यकीय, संगणक, अभियांत्रिकी याबाबत शिक्षण देणा-या अनेक नामंकित संस्था शहरात आहेत. उच्च शिक्षणाबरोबर माध्यमिक शिक्षणाची सोय बहुसंख्य शाळांमध्ये आहे. याच बरोबर तांत्रिक शिक्षण देणारे शासनाचे व मनपाचे आयटीआयआहेत.प्राथमिक शिक्षणांसाठी महापालिकेच्या १३२ शाळा आहेत. तर खाजगी शिक्षण संस्थेच्या १५६ शाळा आहेत.शहरातील गावागावातील आधुनिक शिक्षणाची सुरुवात २०व्या शतकात सुरु झाली पण त्यापूर्वी या भागातील पहिली शाळा चिंचवड गावात इ.स. १८९० मध्ये सुरु झाली. त्यानंतर स्वातंत्र्यपूर्वकाळात गावागावात प्राथमिक शाळा सुरु झाल्या.

माध्यमिक शिक्षणाची सुरुवात १९२७ पासून झाली. प्रारंभी चिंचवड गावात जैन विद्यालयाची स्थापना झाली. १९४८ मध्ये पिंपरी कँम्पमध्ये जयहिंद हायस्कूल सुरु झाले. १९५८ मध्ये एचए हायस्कूल सुरु झाले. तर १९६२ मध्ये पिंपरीगावात नवमहाराष्ट्र विद्यालय सुरु झाले. १९७० मध्ये आकुर्डीला म्हाळसाकांत विद्यालय सुरु झाले. याचबरोबर नंतरच्या काळात इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळा सुरु झाल्या. १९८१ मध्ये ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय सुरु झाले. अलिकडच्या काळात अनेक संस्थानी आपल्या शैक्षणिक कार्याने नावलौकिक मिळविला आहे.
 
Search
Area
Category
 

This site is owned by Pimpri Chinchwad Infomedia Pvt.Ltd;
Bhakti Complex, Behind Dr. Ambedkar statue, Off Mumbai-Pune Highway, Kharalwadi, Pimpri, Pune-411018.
Phone no. @ 2742 42 02. Email:pciplindia@gmail.com
© All rights reserved