Wednesday, 08-02-2012   
 
 
प्राचीन अश्मवर्तुळे


इतिहास


पिंपरी-चिंचवड शहराचा इतिहास म्हणजे महापालिकेत समाविष्ट असलेल्या गावांचा इतिहास. ७ मार्च १९७० रोजी पिंपरी-चिंचवड नगरपालिकेची स्थापना झाली. शहर म्हणून विचार केला तर पिंपरी-चिंचवडचा इतिहास केवळ ३८ वर्षांचा, पण हे शहर आकारास येण्यासाठी जी पार्श्वभूमी लाभली ती पार्श्वभूमी, इथली संस्कृती, परंपरा याचा विचार करता इसवी सन पूर्व काळापर्यंत मागोवा घेता येतो.

पिंपरी-चिंचवड परिसरात इसवी सन पूर्वकाळापासून लोकवस्ती होती असे दिसून येते. उत्खनन आणि इतिहास संशोधन यामुळे हे सिद्ध झालेले आहे. भोसरी परिसरामध्ये महापाषाणीय संस्कृतीतील शिलावर्तुळे सापडली आहेत. इसवी सन १८८५च्या गॅझेटमध्ये त्याचा उल्लेख आहे. याचबरोबर या शहरातील गावांचे अस्तित्व फार पूर्वीपासून असल्याचे लिखित पुराव्यावरुन दिसते.

राष्ट्रकूटांच्या काळात इसवी सन ७५४ मधील एक ताम्रपट सापडला आहे. राष्ट्रकूट राजा कृष्णराज याने पुगडीभट्ट नावाच्या ब्राम्हणाला बोपखेळू (बोपखेल) हे गाव दान दिले. ते देताना गावाच्या चतु:सीमांचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये कलश (कळस), दर्पपुडिका (दापोडी), भेसउरी (भोसरी) या गावांचा उल्लेख आहे. यावरुन आठव्या शतकापासून ही गावे अस्तित्वात आहेत हे लक्षात येते. नंतरच्या काळातही तसेच शिवशाही आणि पेशवाईतही या भागाला महत्व होते.
 
Search
Area
Category
 

This site is owned by Pimpri Chinchwad Infomedia Pvt.Ltd;
Bhakti Complex, Behind Dr. Ambedkar statue, Off Mumbai-Pune Highway, Kharalwadi, Pimpri, Pune-411018.
Phone no. @ 2742 42 02. Email:pciplindia@gmail.com
© All rights reserved