Sunday, 20-05-2012   
 
 
अजितदादा पवार


राजकीय


१महानगरपालिकेची १९८२ साली स्थापना झाली. त्यानंतर १९८६ सालापर्यंत प्रशासक हरनामसिंग यांनी कारभार पाहिला. २ मार्च १९८६ रोजी पहिली निवडणूक झाली. त्यावेळी ६० वॉर्ड होते. ६० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक २४ जागा मिळाल्या. यावेळी प्रथम महापौर म्हणून ज्ञानेश्वर लांडगे यांची निव़ड झाली.

त्यानंतर २३ फेबु्वारी १९९७मध्ये झालेल्या तिस-या निवडणुकीत काँग्रेसला ३३ जागा मिळाल्या. सुरुवातीच्या काळात प्रा. रामकृष्ण मोरे यांचे नेतृत्व होते. त्यानंतर अजितदादा पवार व रामकृष्ण मोरे या दोघांचेही नेतृत्व काही काळ राहिले. मागील निवडणुकीत १०५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला निर्विवाद बहुमत मिळाले. आता महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे पूर्ण वर्चस्व आहे.

या परिसराचे नेतृत्व सुरुवातीच्या काळात अण्णासाहेब मगर यांनी केले. १९५२ साली ते हवेलीचे आमदार झाले. तेव्हापासून १९७८ पर्यंत त्यांनी या भागाचे नेतृत्व केले. त्यानंतर हवेलीचे आमदार म्हणून सोपानराव फुगे, मोतीराम पवार, अशोक तापकीर हे निवडून आले होते. १९९० मध्ये ज्ञानेश्वर लांडगे त्यानंतर दोन वेळा गजानन बाबर तर सध्या विलास लांडे हे आमदार आहेत. तसेच लक्ष्मण जगताप हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. अण्णासाहेब मगर यांच्यानंतर सर्वच बाबतीत प्रभावी ठरलेले प्रा. रामकृष्ण मोरे व अजितदादा पवार या दोघांचे नेतृत्व शहराला लाभले.

पिंपरी चिंचवड परिसराचा १९५७ मध्ये बारामती लोकसभा मतदार संघात समावेश करण्यात आला. तेव्हापासून अनेकांनी या भागाचे प्रतिनिधीत्व केले. बारामतीमधून खासदार म्हणून १९९१, १९९९ व २००४ अशा चार वेळी शरद पवार भरघोस मतांनी निवडून आले. त्यांनी या भागाचा प्रतिनिधी म्हणून शहरात अनेक नवनवीन प्रकल्प सुरु करणे व अनेक समस्या सोडवून शहर विकासाला चालना दिली आहे.
 
Search
Area
Category
 

This site is owned by Pimpri Chinchwad Infomedia Pvt.Ltd;
Bhakti Complex, Behind Dr. Ambedkar statue, Off Mumbai-Pune Highway, Kharalwadi, Pimpri, Pune-411018.
Phone no. @ 2742 42 02. Email:pciplindia@gmail.com
© All rights reserved