Wednesday, 08-02-2012   
 
 
पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी येथील उड्डाणपूल


रस्ते आणि वाहतूक


पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यातून पुणे-मुंबई महामार्ग जातो. दापोडीपासून निगडीपर्यंत १२ किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे. महामार्गाच्या पश्चिमेला समांतर रेल्वेमार्ग जातो. या रेल्वे मार्गावर दापोडी, कासारवाडी,पिंपरी, चिंचवड, आकुर्डी ही रेल्वे स्थानके आहेत. मालाची चढउतार करण्यासाठी चिंचवड येथे मालधक्काही आहे. शहराच्या पश्चिमेला नवीन द्रुतगती मार्ग आहे. तसेच पुणे- नाशिक महामार्ग शहरातून दापोडी, कासारवाडी, भोसरी वरुन पुढे जातो.

प्रवासी वाहतुकीसाठी वल्लभनगर या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाचे स्वतंत्र बसस्थानक आहे. येथून राज्यातील विविध ठिकाणी एसटी बस वाहतूक चालते. शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी व पुणे शहरातील विविध भागात जाण्यायेण्यासाठी 'पीएमपीएमएल'ची बससेवा आहे. शहरापासून २० किलोमीटर अंतरावर चाकण येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचे काम सुरू होत आहे.
 
Search
Area
Category
 

This site is owned by Pimpri Chinchwad Infomedia Pvt.Ltd;
Bhakti Complex, Behind Dr. Ambedkar statue, Off Mumbai-Pune Highway, Kharalwadi, Pimpri, Pune-411018.
Phone no. @ 2742 42 02. Email:pciplindia@gmail.com
© All rights reserved