Wednesday, 08-02-2012   
 
 
चिंचवडचे रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह


सांस्कृतिक


पिंपरी-चिंचवड शहराचे सांस्कृतिक केंद्र म्हणून चिंचवड गावाचा उल्लेख करावा लागेल. चिंचवडमध्ये अनेक सांस्कृतिक संस्था कार्यरत आहेत. त्यामध्ये संगीत कलोपासक मंडळ ही सर्वात जुनी संस्था. तिची स्थापना १९६६ मध्ये झाली. पं. पद्माकर कुलकर्णी यांनी १९८६ मध्ये डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल फाऊंडेशन ही संस्था स्थापन केली व शहरातील पहिला संगीत महोत्सव सुरु केला त्यानंतर महानगरपालिकेतर्फे १९९८ पासून स्वरसागर संगीत महोत्सव सुरु करण्यात आला.शहरात गणेशोत्सवाच्या काळात पिंपरी-चिंचवड महोत्सवाचे मोठ्या स्वरूपात आयोजन करण्यात येते. महापालिकेने कला अकादमीची स्थापना केली. या सर्वांच्या प्रयत्नातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकारांचे कायर्क्रम शहरात झाले.

महापालिकेच्या वतीने १९९४ मध्ये शहरातील पहिले नाट्यगृह चिंचवड येथे साकारले. त्याला प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह असे नाव देण्यात आले. त्यानंतर संत तुकारामनगरला आचार्य अत्रे रंगमंदिर झाले. यामुळे शहरातील नाट्य व सांस्कृतिक चळवळीला चालना मिळाली. १९९९ मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन शहरात झाले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे कामकाज भाऊसाहेब भोईर यांच्या नेतृत्वाखाली चालते. त्या माध्यमातूनही अनेक मोठमोठया कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शहरात दरवर्षी व्याख्यानमाला आयोजित करत असतात. शहरात अनेक सांस्कृतिक व साहित्यिक संस्था कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत सातत्याने साहित्यिक सांस्कृतिक कायर्क्रमांचे आयोजन केले जाते.

 
Search
Area
Category
 

This site is owned by Pimpri Chinchwad Infomedia Pvt.Ltd;
Bhakti Complex, Behind Dr. Ambedkar statue, Off Mumbai-Pune Highway, Kharalwadi, Pimpri, Pune-411018.
Phone no. @ 2742 42 02. Email:pciplindia@gmail.com
© All rights reserved