Wednesday, 08-02-2012   
 
 
महापालिका भवन


शहराचा उदय आणि विस्तार


१९५४ साली पिंपरीमध्ये हिंदुस्थान एन्टिबायोटिक्स (एचए) कारखाना सुरु झाला. 'एचए' नंतर या परिसरात अनेक कारखाने उभारले जाऊ लागले. त्यामुळे कामगारांची संख्या वाढू लागली.वाढत्या औद्योगिकरणाचा परिणाम पुणे शहरावर होऊ शकतो म्हणून नवनिर्मित शहराची कल्पना पुढे आली. या भागातील मुख्य चार गावे पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी येथील ग्राम पंचायती विसर्जित करुन ४ मार्च १९७० रोजी पिंपरी-चिंचवड नवनगर पालिका स्थापन झाली.यावेळी शहराची लोकसंख्या ७० हजार होती.नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष म्हणून स्थानिक आमदार अण्णासाहेब मगर यांची नियुक्त केली. त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा, सफाई, लाईट, शाळा व इतर प्रारंभिक सोयीसुविधांसाठी प्रयत्न केले. १९७८ मध्ये नगरपालिकेची पहिली निवडणूक झाली. त्यामध्ये डॉ. श्री. श्री. घारे हे नगराध्यक्ष झाले. त्यांनीही शहरवासियांसाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न केला.

सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपऴे निलख, रहाटणी, थेरगाव, वाकड या गावांचा समावेश करुन ११ ऑक्टोबर १९८२ रोजी महापालिका अस्तित्वात आली. महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर प्रशासक म्हणून हरनामसिंग यांची नेमणूक करण्यात आली. त्यांनी शहर हरित करण्याबरोबर इतर पायाभूत सुविधांसाठी प्रयत्न केले. त्यानंतर १९८६मध्ये पहिली सार्वजनिक निवडणूक झाली. १९९७ मध्ये पुन्हा हद्दवाढ करण्यात आली. त्यामध्ये तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चोवीसावा़डी, च-होली, दिघी, बोपखेल, दापोडी, मामुर्डी, किवळे, रावेत , पुनावळे, ताथवडे या गावांना समावेश करण्यात आला. इ.स. २००१ सालच्या जणगणनेनुसार शहराची लोकसंख्या १० लाख ६ हजार ४१७ इतकी होती. आता ती सुमारे १५ लाखांच्या घरात आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपर्णा डोके या शहराच्या महापौर असून आशीष शर्मा हे महापालिका आयुक्त आहेत.
 
Search
Area
Category
 

This site is owned by Pimpri Chinchwad Infomedia Pvt.Ltd;
Bhakti Complex, Behind Dr. Ambedkar statue, Off Mumbai-Pune Highway, Kharalwadi, Pimpri, Pune-411018.
Phone no. @ 2742 42 02. Email:pciplindia@gmail.com
© All rights reserved