Wednesday, 08-02-2012   
 
 
क्रांतिवीर चापेकर वाडा - क्रांतितीर्थ


स्वातंत्र्य चळवळीतील योगदान


क्रांतिकारकांच्या बलिदानाने देशाला स्वातंत्र्य मिळाले.अनेक क्रांतिकारकांनी मातृभूमीसाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात एकाच घरातील तीन बंधूंना झालेली फाशी हे जाज्ज्वल्य देशभक्तीचे उदाहरण आहे ते चापेकर बंधू चिंचवडचे. १८९७ मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली होती. त्यावेळी रॅन्ड या इंग्रज अधिका-याने प्लेगच्या नावाखाली लोकांना छळले. त्यामुळे चापेकर बंधूंनी रॅन्डचा खून केला. त्याबद्दल दामोदर, बाळकृष्ण व वासुदेव या तीन चापेकर बंधूंना इंग्रज सरकारने फासावर चढविले.

स्वातंत्र्य चळवळीत या भागातील गावागावातील कार्यकर्त्यांनी भाग घेतला. बुलेटीन वाटणे, टेलिफोन तारा तोडणे, इंग्रज सरकारला असहकार करणे. अशा अनेक गोष्टींबरोबरच पुणे शहर आणि अँम्युनिशन फॅक्टरीला होणारा वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी विजेचा मोठा खांब पाडला. हे काम डॉ. श्री. श्री. घारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी केले.

स्वातंत्र्यचळवळीला पूरक राष्ट्रीय विचारांना चालना देणारी पाठशाळा चिंचवड येथे १९१६ मध्ये सुरू करण्यात आली होती. या शाळेत महात्मा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक आदी तत्कालिन नेत्यांनी मार्गदर्शन केले होते. या परिसराने स्वातंत्र्य चळवळीत फार मोठे योगदान दिले आहे.
 
Search
Area
Category
 

This site is owned by Pimpri Chinchwad Infomedia Pvt.Ltd;
Bhakti Complex, Behind Dr. Ambedkar statue, Off Mumbai-Pune Highway, Kharalwadi, Pimpri, Pune-411018.
Phone no. @ 2742 42 02. Email:pciplindia@gmail.com
© All rights reserved